ABOUT US
The Way It Should Be
आमची सुरुवात...
आम्हाला सांगतांना गौरव वाटतो कि सन १९२५ ला स्व. विष्णुपंत जगन्नाथ भालेराव यांनी सुरु केलेली पेढी आजवर आपल्या सेवेत रुजू ठेवून आहोत आणि आज हा वारसा तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचविला आहे व या पुढेहि याच विश्वासाने आणि आपल्या सहकार्याने असाच मार्गस्थ असेल.
आजवरचा हा प्रवास शक्य झाला आहे फक्त आपल्यामुळे म्हणजेच आमच्या ग्राहकराजाने ज्यांने पिढ्या न पिढ्या आमच्यावर अविरत विश्वास ठेवला आणि आम्हीही तो पुरेपूर जोपासलाय. म्हणूनच "विश्वास हीच प्रतिष्ठा" हे आमचं आता ब्रीद वाक्यच झालय.
आमची वाटचाल...
आपले अमूल्य सहकार्य असेच लाभत राहील याच आशेने वाटचाल करत आम्ही घेऊन आलोय ऑन-लाईन वेबसाइट जिथे आपल्याला आमच्या दालनातील दाग-दागिने बघता येतील आणि खरेदी सुद्धा करता येतील. आपण खरेदी केलेले दागिने आजरोजी यवतमाळ शहरात आणि पुढे चालून महाराष्ट्रातील प्रमुख शहरात आम्ही घरपोच देण्याचा प्रयत्न करू.
आम्हाला सांगतांना अभिमान वाटतो कि मागील ९ वर्षांपासून आम्ही अधिकृत हॉलमार्क (Authorised BIS-916 Gold Hallmark Retailer in Yavatmal) विक्रेते आहोत. म्हणजे भारत सरकारच्या संस्था (BIS - Bureau of Indian Standards) मार्फत दागिन्यांची शुद्धता तपासून लावलेला शिक्का, ज्यामुळे आपल्याला मिळते शुद्धतेची संपूर्ण हमी.