top of page

नवीन हॉलमार्क नियमावली 

01-April-2023 पासून संपूर्ण भारत भर लागू 

Implementation of New Hallmark Rule on Gold Hallmarking with 6 digit HUID

HUID Rule VJBGold.jpg

नवीन नियम काय सांगतो? 

"BIS ने सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग आता बंधनकारक केले आहे. त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करत असतांना दागिन्यांवर सहा अंकी HUID सह हॉलमार्क आहे की नाही हे तपासून घ्या. BIS च्या हॉलमार्किंगअंतर्गत ज्वेलर्सला हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी नोंदणी क्रमांक दिला जातो."

नवीन हॉलमार्कशिवाय दुकानदार सोने किंवा दागिने विकू शकणार नाहीत. परंतु ग्राहक 1 एप्रिलनंतरही जुने हॉलमार्क असलेले दागिने ज्वेलर्सला विकू शकतात.

  जुन्या दागिन्यांचे काय होणार? 

ग्राहकाकडे आधीपासून हॉलमार्क नसलेले दागिने असतील तर त्यावर परिणाम होणार नाही आणि पूर्वीप्रमाणेच विक्री करता येईल. ज्वेलर्स असे दागिने त्याच्या योग्य त्या शुद्धते नुसार वा पावतीवर नमूद केल्या प्रमाणे खरेदी करू शकतात. एखाद्या ज्वेलर्सने ग्राहकाकडून सोने खरेदी करण्यास किंवा देवाणघेवाण करण्यास नकार दिल्यास त्याच्यावरही कारवाई होऊ शकते.

HUID ​म्हणजे काय व तो कसा असतो/ कसा ओळखावा?     

प्रत्येक दागिन्याची स्वतःची वेगळी ओळख असते. HUID क्रमांकाच्या मदतीने ग्राहकाला सोने आणि दागिन्याच्या शुद्धते संबंधित सर्व माहिती मिळेल. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल. ज्वेलर्सना ही माहिती BIS पोर्टलवर टाकावी लागेल.


प्रत्येक ज्वेलरीवर, सरकारी लॅब मधून त्याची शुद्धता तपासून त्याला प्रमाणित करून यूनिक नंबर लावला जाईल. याला आपण त्या दागिन्यांचा सर्टिफिकेट नंबर म्हणू शकतो. HUID क्रमांक BIS CARE ऍप वर जाऊन तपासला जाऊ शकतो. खाली दिलेल्या विडिओ लिंक वर आपण हि माहिती बघू शकता.

या नियमानुसार 2 ग्रॅम च्या आत वजन असलेल्या दागिन्यांना HUID असणे बंधनकारक नाही पण २ ग्रॅम वरील दागिन्यांवर HUID असणे गरजेचे आहे.

VJB 24K HUID.jpg
VJB 22K HUID.jpg
कॅरेट किती प्रकारचे असतात?

कॅरेट पाच प्रकारचे असतात. कॅरेट व त्यासमोर त्याची शुद्धता खालील प्रमाणे असते:
a) 24 - 99.5%
b) 22 - 91.6%
c) 20 - 83.3%
d) 18 - 75.0%
e) 14 - 58.3%

पीवरच्या दागिन्यांना 24K 995 असा हॉलमार्क असावा 
इतर दागिन्यांवर 22K 916 असा हॉलमार्क अपेक्षित आहे 
हिरांच्या दागिन्यांचे सोने 75 टक्के असल्यामुळे त्यावर 18K 750 असा मार्क असावा

HUID कसा तपासावा?

6-Digit HUID क्रमांक BIS CARE ऍप वर जाऊन तपासला जाऊ शकतो. BIS Care App मध्ये बाजूला दिलेल्या इमेज प्रमाणे "Verify HUID" वर क्लीक करावे व आपल्या दागिन्यावरील 6-Digit HUID टाकावा. तो टाकल्यावर त्या दागिन्यांची सर्व माहिती आपल्याला दिसेल. App वरील दागिन्यांची कॅरेट/शुद्धता व आपल्या दागिन्यावरील नमूद कॅरेट/शुद्धता मॅच होणे आवश्यक आहे.


खाली दिलेल्या लिंक वरून आपण BIS CARE App डाउनलोड करू शकता:
https://play.google.com/store/apps/details?id=com.bis.bisapp
 

New_BIS_App - .png
bottom of page